
नवी दिल्ली : अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे झेपावलेले एअर इंडियाचे बोइंग ७८७ विमान दोन मिनिटात कोसळले, मात्र या विमानाने नुकतीच पॅरिसवारी केली होती आणि ते पॅरिसहून दिल्लीमार्गे अहमदाबादला सुखरूप पोचले होते, असे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.