Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं, 242 प्रवासी असल्याची माहिती

Air India plane with 242 passengers onboard has crashed in Gujarat: गुजरातमधील अहमदाबादात एअर इंडियाचे विमान क्रॅश, मेघानी भागात आगीच्या ज्वाळा, बचावकार्य तीव्र; जखमींना रुग्णालयात हलवले.
Ahmedabad Plane Crash
Ahmedabad Plane Crashesakal
Updated on

गुजरातमधील अहमदाबाद शहरात गुरुवारी (12 जून 2025) दुपारी एक धक्कादायक विमान दुर्घटना घडली. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेकऑफ करताना एअर इंडियाचे प्रवासी विमान AI171 मेघानी नगर परिसरात कोसळले. या विमानात 242 प्रवासी आणि कर्मचारी सवार होते. प्राथमिक माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचा विमानावरील ताबा सुटला आणि विमान खुल्या मैदानात कोसळले. या अपघातामुळे परिसरात आगीच्या मोठ्या ज्वाळा आणि काळ्या धुराचा लोट दिसून आला, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. इमारती मोठ्या प्रमाणात कोसळल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com