

Air India
esakal
एअर इंडियाच्या एका वैमानिकासाठी मोठी संकट आले आहे. दिल्लीकडे निघणाऱ्या विमानाच्या उड्डाणापूर्वी त्याच्या तोंडातून मद्याचा तीव्र वास येत असल्याचे लक्षात आल्याने त्याला तात्काळ रोखण्यात आले. ही घटना २३ डिसेंबर २०२५ रोजी व्हँकुव्हर विमानतळावर घडली. फ्लाइट एआय १८६ ही बोईंग ७७७ विमान व्हिएन्ना मार्गे दिल्लीला जाणार होती, आणि तिचे संचालन चार वैमानिकांच्या गटाकडून होणार होते. मात्र, कॅनेडियन अधिकाऱ्यांनी केलेल्या ब्रेथलायझर चाचणीत वैमानिक अपयशी ठरल्याने त्याला कर्तव्यावरून दूर करण्यात आले. यामुळे संभाव्य अपघात टळला आणि जगाने एक मोठी आपत्ती टाळली.