Travel Guidelines : चीनसह पाच देशातून येणाऱ्या प्रवाशांची होणार RT-PCR चाचणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Airport

Travel Guidelines : चीनसह पाच देशातून येणाऱ्या प्रवाशांची होणार RT-PCR चाचणी

Coronavirus India Travel Guidelines : चीनसह जगातील काही देशांमध्ये वाढत्या कोरोना रूग्णसंख्येनंतर अनेक देशांनी पुन्हा एकदा कोरोना निर्बंध कठोर करण्यास सुरूवात केली आहे.

चीनमधील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेत भारत सरकारकडून नव्याने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना भारतात दाखल होण्यापूर्वी त्यांची सध्याची आरोग्य स्थिती सांगणे अनिवार्य करण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या जारी करण्यात आलेल्या नव्या आदेशांनंतर चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून येणाऱ्या प्रवाशांना एअर सुविधा फॉर्म भरणे अनिवार्य असणार आहे.

हेही वाचा: BF.7 Variant : नव्या व्हेरिएंटवर जुनी लस किती प्रभावी?; अभ्यासातून धक्कादायक खुलासे

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, चीन, जपान, कोरिया आणि हाँगकाँग येथून येणाऱ्या सर्व विमानांचे थर्मल स्कॅनिंग केले जाणार आहे. तसेच वरील पाच देशातून भारतात दाखल होणारी कोणतीही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचेही मांडविया यांनी स्पष्ट केले आहे.

विमानातून उतरताना प्रत्येक प्रवाशाला कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. विमानतळाच्या एंट्री पॉइंटवर सर्व प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग केली जाणार असून, थर्मल स्क्रिनिंग दरम्यान प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्याला वेगळे करून उपचारासाठी पाठवले जाईल. संबंधित रूग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना क्वारंटाइन केले जाणार आहे.