Air taxi : ओडिशात होणार हवाई टॅक्सीची निर्मिती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Air taxi

Air taxi : ओडिशात होणार हवाई टॅक्सीची निर्मिती!

भुवनेश्‍वर : देशात आगामी काळात हवाई टॅक्सीची संकल्पना सत्यात उतरण्याची शक्यता आहे. बंगळूर येथील बंबल बी फ्लाईटस् ही स्टार्टअप कंपनी लवकरच ओडीशामध्ये हवाई टॅक्सीच्या निर्मितीस सुरुवात करणार आहे. प्रसिद्ध उद्योजक आणि हवाई वाहतूक तज्ज्ञ अर्जुन दास यांनी बंबल बी फ्लाईटस् प्रा. लि. ही स्टार्टअप कंपनी सुरू केले आहे. . ही कंपनी लवकरच ओडिशामध्ये हवाई टॅक्सीची निर्मिती सुरू करणार आहे. पुढील वर्षी एप्रिल महिन्यामध्ये या हवाई टॅक्सीचे प्रायोगिक तत्त्वावरील उत्पादन पूर्ण होणे अपेक्षित असून २०२४ पासून हवाई टॅक्सीचे नियमित उत्पादन सुरू होईल असे कंपनीचे म्हणणे आहे.विशेष म्हणजे ओडिशा येथे नुकत्याच झालेल्या ओडिशा कॉन्क्लेव्ह २०२२ मध्ये बंबल बी फ्लाईटस् च्या या प्रकल्पाला, अमेरिकेतील एसआरएएम अँड एमआरएएम टेक्नॉलॉजी या कंपनीकडून सुमारे ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे.

अशी असेल हवाई टॅक्सी

हवाई टॅक्सीचे वजन अवघे ३०० किलोग्रॅम असणार आहे. सामान्यतः ही हवाई टॅक्सी सौर ऊर्जेवरही चालणार आहे. हवाई टॅक्सीला उतरण्यासाठी किंवा उड्डाण घेण्यासाठी हेलिपॅडची गरज नसून ही इमारतीच्या छतावर देखील उतरू शकते असा दावा कंपनीने केला आहे. यापूर्वीच्या चाचणीत ही टॅक्सी २० मिनिटांसाठी २० किमी अंतर कापू शकली आहे.

यासाठी वापर

  • हवाई रुग्णवाहिका

  • हवाई वाहतूक

  • हवाई पर्यटन

  • मालवाहतूक

  • संरक्षण क्षेत्रातील उपकरणांची वाहतूक