

DGCA Investigation Into Aircraft Crash Finds Possible Unauthorized Ethanol Blended Fuel and Serious Human Resource Failures
esakal
बेळगाव : बेळगाव विमानतळाजवळ ३० मे २०२३ रोजी प्रशिक्षणार्थी विमानाला झालेल्या अपघातामागे विमानाच्या इंजिन देखभालीतील गंभीर त्रुटींसह निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक इथेनॉलमिश्रित इंधनाचा वापरही कारणीभूत ठरल्याचे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) तपासात समोर आले आहे. रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीच्या (आरएफटीए) बेळगाव केंद्रातील देखभाल व्यवस्था, तांत्रिक मनुष्यबळ आणि अंतर्गत सुरक्षा नियंत्रणातील त्रुटींवरही अहवालात बोट ठेवण्यात आले आहे.