esakal | Airforce day 2021: आता भारतातूनच करता येईल बालाकोट सारखा Air Strike
sakal

बोलून बातमी शोधा

indian airforce

राष्ट्रीय हित डोळ्यासमोर ठेऊन इंडियन एअर फोर्स फक्त हवाई हद्दीचेच रक्षण करत नाही, तर संकटकाळात नैसर्गिक आपत्तीच्यावेळी बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

Airforce day 2021: आता भारतातूनच करता येईल बालाकोट सारखा Air Strike

sakal_logo
By
दीनानाथ परब

भारतात दरवर्षी आठ ऑक्टोबरला इंडियन एअर फोर्स डे साजरा केला जातो. कारण १९३२ साली याच दिवशी भारतात अधिकृतरित्या एअर फोर्सची स्थापना झाली. त्यावेळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते. त्यामुळे सुरुवातीला युनायटेड किंगडमच्या रॉयल एअर फोर्सला मदत करण्याचा रोल इंडियन एअर फोर्सकडे होता. दरवर्षी उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथील हिंडन एअर फोर्स स्टेशनवर इंडियन एअर फोर्स डे साजरा केला जातो. यावेळी एअर फोर्सकडून फायटर विमानांची चित्तथरारकं प्रात्यक्षिक सादर केली जातात. आयएएफ प्रमुख आणि तिन्ही सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित असतात.

इंडियन एअर फोर्स डे चा इतिहास

इंडियन एअर फोर्सला भारतीय वायू सेनाही म्हटलं जातं. ब्रिटीश राजवटीत स्थापना झाल्यानंतर एप्रिल १९३३ मध्ये इंडियन एअर फोर्सचं पहिलं स्क्वाड्रन कार्यान्वित झालं. दुसऱ्या महायुद्धातील सहभागानंतर भारतीय हवाई दलाला रॉयल इंडियन एअर फोर्सची ओळख मिळाली.

इंडियन एअर फोर्स डे चं महत्त्व

इंडियन एअर फोर्स भारतीय सैन्य दलाचं अत्यंत महत्त्वाचं अंग आहे. आतापर्यंत लढल्या गेलेल्या युद्धात एअर फोर्सने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारताची हवाई हद्द सुरक्षित ठेवणं आणि युद्ध प्रसंगात शत्रूच्या फायटर विमानांवर अचूक निशाणा साधणं, ही एअर फोर्स समोर दोन मुख्य लक्ष्य आहेत.

स्वातंत्र्यानंतर लढल्या गेलेल्या युद्धांमध्ये इंडियन एअर फोर्सने आपली भूमिका चोख बजावली आहे. पाकिस्तान बरोबर आतापर्यंत चार तर चीन बरोबर एकदा युद्ध झालं आहे. राष्ट्रीय हित डोळ्यासमोर ठेऊन इंडियन एअर फोर्स फक्त हवाई हद्दीचेच रक्षण करत नाही, तर संकटकाळात नैसर्गिक आपत्तीच्यावेळी बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

हेही वाचा: वायूसेनेत इतिहास रचणाऱ्या 'या' आहेत महिला फायटर पायलट

इंडियन एअर फोर्सबद्दल जाणून घ्या काही खास गोष्टी

- इंडियन एअर फोर्स जगातील चौथे सर्वात मोठे हवाई दल आहे. अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारताचा नंबर लागतो.

- नभम स्पर्शन दीप्तम हे एअर फोर्सचं ब्रीद वाक्य आहे. याचा अर्थ टच द स्काय विथ ग्लोरी असा होता. भगवत गीतेच्या ११ व्या अध्यायातून एअर फोर्सने या ब्रीद वाक्याची निवड केली आहे.

- इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात १४०० पेक्षा जास्त विमाने असून १७ हजार कर्मचारी आहेत.

- उत्तर प्रदेशात गाझियाबाद येथे असलेला हिंडन एअर फोर्स स्टेशन हा आशियातील सर्वात मोठा बेस आहे. जगातील हा आठवा सर्वात मोठा बेस आहे.

- ऑपरेशन पुमलई, ऑपरेशन विजय, ऑपरेशन मेघदूतमध्ये इंडियन एअर फोर्सने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

loading image
go to top