
अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी सरकारने टप्याटप्याने अंतर्गत सेवा सुविधा चालू करण्याचा निर्णय घेतला आहे.देशातील प्रवासी विमान सेवा २५मे पासून सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले
विमान प्रवासासाठी मार्गदर्शक नियम जाहीर; सेतू ऍप विषयी महत्वाची घोषणा
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गाने देशातील सर्वानाच घरात बंदिस्त केले. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली. याचा जबर फटका अर्थव्यवस्थेला बसला असून, पुन्हा अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी सरकारने टप्याटप्याने अंतर्गत सेवा सुविधा चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार देशातील प्रवासी विमान सेवा २५ मे पासून सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र कोरोनाच्या खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. ज्यामध्ये प्रवाशांना आरोग्य सेतू ऍप बंधनकारक करण्यात आले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर थंडावलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना मिळावी म्हणून केंद्र सरकारने टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात काहीशी मुभा देत टाळेबंदीचे नियम शिथिल केले आहेत. त्यानुसारच देशांतर्गत प्रवासासाठी सरकारने हिरवा कंदील दिलेला असून, येत्या २५ मे पासून विमान सेवा सुरु होणार असल्याचे केंद्रीय नागरीक हवाई उड्डयन मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी ट्विटर वरून जाहीर केले. त्यानंतर कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) महामारीचे गांभीर्य विचारात घेऊन प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक नियम जाहीर केले आहेत. यानुसार प्रवाशांना आरोग्य सेतू ऍप बंधनकारक असणार आहे. तर १४ वर्षाखालील मुलांना आरोग्य सेतू ऍपमधून मुभा देण्यात आली आहे. तसेच विमानतळावर दाखल होण्यापूर्वी थर्मल स्क्रिनिंग अनिवार्य करण्यात आले असून, सामानाचे देखील निर्जंतुकीकरण करणे गरजेचे असल्याचे म्हंटले आहे. आरोग्याच्या समस्या असणारे, वयोवृद्ध आणि गर्भवती स्त्रियांनी शक्यतो प्रवास टाळण्याचे आवाहन नागरीक हवाई उड्डयन मंत्रालयाने आपल्या परिपत्रकात केले आहे. याव्यतिरिक्त प्रवाशांनी तोंडाचा मास्क परिधान करावा, आणि आपल्या प्रवासाच्या दोन तास आधी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
दरम्यान याआधीच अडचणीत असणाऱ्या विमान कंपन्यांना कोरोनाच्या टाळेबंदीमुळे अजूनच गर्तेत टाकले आहे. विमान क्षेत्राला याचा मोठा फटका बसला असून बऱ्याच विमान कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली आहे. त्यामुळे नागरीक हवाई उड्डयन मंत्रालयाच्या या निर्णयामुळे विमान कंपन्यांना थोडाफार दिलासा मिळाला असला तरी, खबरदारीचा उपाय म्हणून विमान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी देखील काही नियम पाळण्यास सांगण्यात आले आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Web Title: Airlines Announced Travel Guide Rules Important Announcement About Setu App
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..