ऐश्वर्या राय म्हणते, माझे पती घालतात महिलांची कपडे

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

ऐश्वर्या राय यांनी म्हटले आहे की, माझे पती महिलांची कपडे घालतात.

पटणाः बिहारचे आरोग्य मंत्री तेज प्रताप यादव हे घागरा-चोळी परिधान करतात. शिवाय, ते व्यसनाच्या आहारी गेले असून, शंकराचा अवतार धारण करतात, असे त्यांची पत्नी ऐश्वर्या राय यांनी म्हटले आहे.

ऐश्वर्या यांनी घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. [ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा] त्यांनी केलेल्या अर्जामध्ये म्हटले आहे की, 'आमचा विवाह झाल्यानंतर काही दिवसांमध्येच तेज प्रताप यादव हे व्यसनाच्या आहारी गेल्याचे लक्षात आले. अनेकदा ते ड्रग्ज घेतात. शिवाय, देव शंकर व कृष्णाचा अवतार धारण करून बसतात. एवढेच नव्हे तर घागरा व चोळी घालून राधा असल्याचे सांगू लागतात. केसांचेही मेकअप करत बसतात.'

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव व राबरी देवी यांचा मोठा मुलगा तेज प्रताप व ऐश्वर्या यांचा मे 2018 मध्ये विवाह झाला आहे. माझ्या कुटुंबियांना या बाबतची माहिती देऊन काहीच उपयोग झाला नसून, तेज प्रताप यांच्या वागण्यामध्ये बदल होऊ शकला नाही. ऐश्वर्या यांनी अर्जामध्ये पुढे म्हटले आहे की, 'ड्रग्जचे व्यसन थांबवण्यासाठी अनेकदा पतीकडे विनवणी केली. पण, ते थांबवत नाहीत. ड्रग्जचे सेवन केले की ते देवाचे रुप धारण करतात. गांजा म्हणजे भोले बाबाचा प्रसाद आहे. त्याला नाही म्हणू शकत नाही. कृष्ण राधा आहे तर राधा कृष्ण आहे, असे उत्तर देऊ लागतात.'

दरम्यान, ऐश्वर्या यांनी विवाह झाल्यानंतर पाच महिन्यांनी घटस्फोटासाठी पाटणा न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aishwarya Rai says my husband wore ghagra and choli