अजिंठ्याला लाभणार लकाकी; १२ प्रमुख पर्यटनस्थळी स्वच्छता मोहीम

अजिंठ्याला लाभणार लकाकी; १२ प्रमुख पर्यटनस्थळी स्वच्छता मोहीम

नवी दिल्ली : जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाने देशातील बारा प्रमुख पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्रांची स्वच्छतेच्या विशेष मोहिमेसाठी निवड केली आहे. यात महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांचाही समावेश आहे. स्वच्छतेच्या या विशेष व्यवस्थेमुळे वृंदावनचे बाके बिहारी मंदिर, आग्रा येथील किल्ला यासारख्या स्थळांना नवी झळाळी लाभणार आहे. देशभरातून आणि जगभरातून येणाऱ्या पर्यटकांच्या सोयी-सुविधांसाठी जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत स्वच्छ आयकॉनिक स्थळ या उपक्रमाच्या चौथ्या टप्प्यात देशातील डझनभर प्रतिष्ठित पर्यटन स्थळे आणि तीर्थक्षेत्रांची निवड केली आहे.

अजिंठ्याला लाभणार लकाकी; १२ प्रमुख पर्यटनस्थळी स्वच्छता मोहीम
२०० फूट टॉवरवर १३५ दिवस धरणे आंदोलन; यशस्वी झाल्यावरच उतरला खाली

या मोहिमेचे उद्दिष्ट पर्यटन स्थळे आणि आसपासच्या परिसरात स्वच्छतेचे निकष सुधारणे आणि येणाऱ्या पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, असा आहे. या पर्यटन आणि तीर्थस्थळांमध्ये उत्तर प्रदेशातील बाके बिहारी मंदिर आणि आग्‍ऱ्याचा किल्ला, महाराष्ट्रातील अजिंठा लेणी, मध्यप्रदेशातील सांचीचा स्तूप, राजस्थानातील कुंभलगड किल्ला, जैसलमेरचा किल्ला आणि रामदेवरा, हैदराबाद मधील गोवळकोंडा किल्ला, ओडिशा मधील कोणार्कचे सूर्य मंदिर, चंडीगडमधील रॉक गार्डन, श्रीनगरमधील दल सरोवर आणि पश्चिम बंगालमधील कालीघाट मंदिराचा समावेश आहे.

अजिंठ्याला लाभणार लकाकी; १२ प्रमुख पर्यटनस्थळी स्वच्छता मोहीम
वृक्षतोडीबद्दल केला चाळीस कोटींचा दंड; कोलकाता हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

परदेशी पर्यटकांचा ओघ लक्षणीय

भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या लक्षणीय राहिली आहे. २०१९ या वर्षात ९६,६९,६३३ परदेशी पर्यटक भारतात आले होते. या परदेशी अतिथीमुळे १,८८,३६४ कोटी रुपये तिजोरीत जमा झाले. तर २०१८ ही रक्कम १,७५,४०७ कोटी रुपये, म्हणजेच ७.४ टक्क्यांनी वाढीव होती. कोरोना संसर्गामुळे जगभरात लॉकडाउन झाल्याने पर्यटनाला त्याचा फटका बसला. अद्यापही पर्यटन बंद असले तरी कोरोना नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा पर्यटकांचा ओघ वाढेल, या अपेक्षेने पर्यटनस्थळांच्या साफसफाईकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com