
राजकारणात मोठा भूकंप आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) सात विद्यमान आमदारांनी शनिवारी सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षात (NDPP) विलयाचा निर्णय घेतला. यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एनसीपी गटाला मोठा धक्का बसला आहे. या विलयामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्या नेतृत्वाखालील NDPP ला 60 सदस्यीय विधानसभेत पूर्ण बहुमत प्राप्त झाले आहे. NDPP च्या आमदारांची संख्या आता 25 वरून 32 वर गेली आहे.