Masjid Loud Speaker Controversy | महाराष्ट्र, कर्नाटकनंतर आता राजस्थानातही भोंग्यांची काँट्रोव्हर्सी, 'बंद'चे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Masjid Loud Speaker Controversy

महाराष्ट्र, कर्नाटकनंतर आता राजस्थानातही भोंग्यांची काँट्रोव्हर्सी, 'बंद'चे आदेश

गुढीपाडव्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेत मशिदींवरील भोंग्यांविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. राज ठाकरे यांनी दिलेल्या घोषणेमुळे मनसैनिकांनी मशिदींसमोर हनुमान चालिसाचे पठन सुरू केले. मशिदींवरून भोंगे न उतरवल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याची धमकी दिली आहे. (Masjid LoudSpeaker Controversy)

या दरम्यान, कर्नाटक सरकारने सर्व सार्वजनिक आणि धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी घालणारा आदेश काढला. यापाठोपाठ आता राजस्थानचाही नंबर लागला आहे. अजमेर जिल्हा प्रशासनाने धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर्स काढण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा: डेक्कन परिसरात मशिदीवरील भोंगे बंद करण्याची मागणी

राजस्थानात जिल्हा प्रशासनाने ध्वनी नियंत्रण कायदा, 1963 आणि 2005 च्या आदेशाचा दाखला देत, नोटीसमध्ये "सार्वजनिक आणि धार्मिक ठिकाणी शांतता राखण्यासाठी" लाऊड स्पीकर बंद करण्याची नोटीस काढली आहे. 'ध्वनी प्रदूषणामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं आदेशात नमूद आहे.

Web Title: Ajmer District Administration Of Rajsthan Ordered To Remove Masjid Loud Speaker Controversy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Raj Thackeray
go to top