
लखनौ : ‘‘दुसऱ्यांवर टीका करणारे त्यांच्याच राज्यात असलेल्या मथुरेतून वाहणाऱ्या यमुना नदीच्या पाण्यात आचमन करून दाखवू शकतील का?’’ असा सवाल करत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी नाव न घेता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर शुक्रवारी ‘एक्स’या समाज माध्यमातून टीका केली आहे.