युपीत 304 जागांसह आम्हीच विजयी; अखिलेश यांचा दावा

अखिलेश यादव
अखिलेश यादव sakal media

लखनऊ : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी मंगळवारी दावा केला की, नुकत्याच झालेल्या यूपी विधानसभा (UP Assembly Election) निवडणुकीत सपाच्या नेतृत्वाखालील आघाडीला पोस्टल बॅलेटपैकी (Postal Ballots) 51.5 टक्के मतदान मिळाले होते आणि या आधारावर त्यांनी 304 जागा जिंकल्या आहेत. या आधारावर युपीमध्ये सपाच विजयी झाल्याचे अखिलेश यांनी म्हटले आहे. अखिलेश यादव यांच्या या दाव्यावर भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी प्रतिक्रिया देत निवडणुका केवळ पोस्टल बॅलेटने होत नाहीत. असे असेल तर, ईव्हीएमचा अर्थ काय? असा प्रश्न शुक्ला यांनी केला आहे. (Akhilesh Yadav Claims His Party Won In UP Polls)

सपा-आघाडीला पोस्टल बॅलेट मतांपैकी 51.5 टक्के मते मिळाली असून, याचा अर्थ सपाने 304 जागांवर विजय नोंदवला," असे त्यांनी अखिलेश यांनी ट्वीटमध्ये म्हटले असून, हे निवडणुकीत सपाच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या विजयाबद्दल सत्य सांगत आहे. पोस्टल मतदान करणाऱ्या प्रत्येक सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि मतदारांचे आभारही अखिलेश यांनी मानले आहेत. तर, सत्ताधारी पक्षाने हे जाणून घेतले पाहिजे की, फसवणूक कोणतेच बळ देत नाही असे म्हणते अखिलेश यांनी 255 जागांसह निवडणूक जिंकलेल्या भाजपवर निशाणा साधला.

अखिलेश यादव
बाऊन्सरची दादागिरी शाळेला भोवणार; निलम गोऱ्हेंचे कारवाईचे निर्देश

भाजपला केवळ 99 जागा

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत बॅलेट पेपरच्या मतदानात सपा 304 वर विजयी झाला आहे, तर भाजप फक्त 99 वर विजयी झाला आहे. पण ईव्हीएममध्ये (EVM) भाजपचा विजय कसा झाला यावरून प्रश्न निर्माण होत असल्याचे सवाल सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी उपस्थित करत मतमोजणीत गडबड झाल्याचा आरोप केला आहे.

उत्तर प्रदेशात बहुमत मिळवून भारतीय जनता पक्ष दुसऱ्यांदा सत्तेत परतला आहे. भाजप आघाडीला 273 जागा मिळाल्या असून, सपाच्या नेतृत्वाखालील आघाडीला 125 जागा मिळाल्या आहेत. बसपा 1, काँग्रेस आणि जनसत्ता दलाच्या उमेदवारांनी प्रत्येकी 2 जागा जिंकल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com