यूपीमध्ये राजकीय घडामोडींना वेग; समाजवादी पक्ष आणि रालोद येणार एकत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यूपीमध्ये राजकीय घडामोडींना वेग; समाजवादी पक्ष आणि रालोद येणार एकत्र?

यूपीमध्ये राजकीय घडामोडींना वेग; समाजवादी पक्ष आणि रालोद येणार एकत्र?

लखनौ : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष (सपा) आणि राष्ट्रीय लोक दल (रालोद) यांच्यातील युती जवळपास निश्चित झाली आहे. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि रालोदचे जयंत चौधरी या दोन्ही पक्षप्रमुखांची आज बुधवारी भेट झाली आहे. या दोघांनीही या भेटीचे छायाचित्र ट्विटरवर पोस्ट केलंय. जयंत यांनी, `बढते कदम' असं तर अखिलेश यांनी, ‘बदलाव की ओर' असं कॅप्शन दिलंय.

या पार्श्वभूमीवर युतीच्या घोषणेची औपचारिकता उरली असून ती लवकरच होण्याची अपेक्षा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जयंत यांनी ५० जागांची मागणी केली आहे. या भेटीत याविषयी चर्चा झाली. याआधी जानेवारीच्या प्रारंभी हे दोन्ही नेते भेटले होते. तेव्हा अखिलेश यांची खाण गैरव्यवहारप्रकरणी सीबीआय चौकशी होण्याची शक्यता होती. त्यावरून जयंत यांनी अखिलेश यांना पाठिंबा दर्शविताना भाजपवर टीका केली होती. चौकशी यंत्रणांचा भाजप गैरवापर करीत असून प्रत्येक जण त्यांच्याकडे लक्ष ठेवून आहे, असे जयंत यांनी सांगितले होते.

अखिलेश यांनी छोट्या पक्षांसह युती करणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. आतापर्यंत ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पक्ष (सुभासपा) आणि संजय चौहान यांच्या जनवादी पक्षाबरोबरील युतीची घोषणा झाली आहे.

loading image
go to top