

Al Falah University Notice
sakal
नवी दिल्ली : दिल्लीतील स्फोटात फरिदाबादच्या अल फलाह विद्यापीठातील डॉक्टरांचा सहभाग उघड झाल्यानंतर तपास यंत्रणांनी या विद्यापीठाभोवती चौकशीचा फास आवळला आहे. विद्यापीठांचे मानांकन ठरविणाऱ्या राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेने (नॅक) मान्यतेच्या खोट्या दाव्यांवरून त्याचप्रमाणे यासोबतच वैद्यकीय नियामक प्राधिकरणानेही (मेडिकल रेग्युलेटरी ऑथॉरिटी) अल फलाह विद्यापीठाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, या विद्यापीठाच्या आर्थिक स्त्रोतांचीही चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.