कनिका कपूरशी संपर्कात आलेल्या सर्वांच्या टेस्ट...

वृत्तसंस्था
सोमवार, 23 मार्च 2020

लंडनहून परतल्यानंतर कनिका कपूर पार्टीमध्ये सहभागी झाली होती आणि काही जणांच्या ती संपर्कात आली होती. कनिका कोरोना रुग्ण असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खळबळ उडाली होती. अनेकांनी तिच्यावर टीका केली होती.

लखनौ : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या गायिका कनिका कपूरच्या संपर्कात आलेल्या 266 जणांची चाचण्या घेण्यात आल्या असून, या सर्वांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

लंडनहून परतल्यानंतर कनिका कपूर पार्टीमध्ये सहभागी झाली होती आणि काही जणांच्या ती संपर्कात आली होती. कनिका कोरोना रुग्ण असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खळबळ उडाली होती. अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. आता तिच्या संपर्कात आलेल्या 266 जणांच्या चाचण्या केल्या असून, त्या निगेटिव्ह आल्या  आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

कनिका लखनौमध्ये एका पार्टीत सहभागी झाली होती. त्या पार्टीत भाजप खासदार दुष्यंत सिंह, उत्तर प्रदेशचे वैद्यकीय मंत्री जयप्रताप सिंह, माजी केंद्रीय मंत्री जतीन प्रसाद आणि त्यांची पत्नी नेहा सहभागी झाल्या होत्या. या सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून, त्यांच्या चाचण्याही निगेटिव्ह आहेत. कनिकाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना देशभरातून एकत्र आणून त्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All 266 contacts of Kanika Kapoor traced, all samples tested negative