
कोहिमा : नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सात आमदारांनी आज पक्षबदल करत सत्ताधारी नॅशनॅलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीत (एनडीपीपी) प्रवेश केला आहे. यामुळे या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ शून्यावर आले आहे, तर मुख्यमंत्री निफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पक्षाचे बळ ३२ झाले आहे. तसेच, ६० सदस्यांच्या विधानसभेत या पक्षाला पूर्ण बहुमत प्राप्त झाले आहे.