Uttarkashi Tunnel Collapse
Uttarkashi Tunnel CollapseEsakal

Uttarkashi Tunnel Collapse: बोगद्यात अडकलेल्यांच्या संयमाचा बांध फुटला, अजून 2-3 दिवस लागणार; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथील बोगद्यामध्ये अडकलेल्या ४० मजुरांना वाचवण्यासाठी अद्याप शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Uttarkashi Tunnel Collapse: उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथील बोगद्यामध्ये अडकलेल्या ४० मजुरांना वाचवण्यासाठी अद्याप शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.अद्याप, मजुरांना बोगद्याबाहेर काढण्यात यश आलेलं नाही. यमुनोत्री हायवेवर धरासू-बडकोटच्या बोगद्यामध्ये मजूर अडकले असून त्यांना वाचवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

आता त्यांना वाचवण्यासाठी आधुनिक तत्रांचा वापर करण्यात येणार आहे. या अडकलेल्या कामगारांचा आता संयम सुटत चालला आहे. केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंह यांनी गुरुवारी सांगितले की, उत्तराखंड जिल्ह्यातील सिल्कियारा बोगद्यात चार दिवसांपेक्षा जास्त काळ अडकलेल्या 40 मजुरांना लवकर आणि सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत, परंतु बचावकार्याला आणखी दोन ते तीन दिवस लागू शकतात.(Latest Marathi News)

घटनास्थळी भेट दिल्यानंतर सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधला, “कामगार त्याहून लवकरही बाहेर येऊ शकतात परंतु अशा परिस्थितीत, आम्ही दोन-तीन दिवसांची बाह्य मर्यादा ठेवली पाहिजे जेणेकरुन आम्ही येणाऱ्या अडचणींचा सामना करू शकू”, असं सिंह म्हणालेत.

सर्व कामगार सुरक्षित राहावेत याला आम्ही प्राधान्य देत आहे. त्यांना लवकरात लवकर बाहेर काढणे हे आमचे लक्ष आहे. त्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत,” असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्र्यांनी बचाव कार्याचा आढावा घेतल्यानंतर सांगितले आहे. तर अडकलेल्या मजुरांशी बोललो असल्याचे त्यांनी सांगितले.

Uttarkashi Tunnel Collapse
Tunnel Collapse दुर्घटना; CM पुष्कर धामी यांचे केंद्रीय बचाव पथकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे निर्देश

कामगारांच्या संयमाचा बांध फुटला

गेल्या पाच दिवसांपासून सिल्कारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या संयमाचा बांध फुटत आहे. आहे. आम्हाला कधीपर्यंत बाहेर काढाल असा प्रश्न कामगारांनी उपस्थित केला आहे. बोगद्यात वेल्डिंगचे काम करत असलेले एमडी रिझवान यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सर्वांना आश्वासन दिले आहे की ते बचावासाठी पाईप टाकण्याचे काम करत आहेत. पाईप टाकल्यावर सर्वांना बाहेर काढले जाईल. (Marathi Tajya Batmya)

एमडी रिजवान हे सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी चालवण्यात येत असलेल्या बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. रिजवान यांनी सांगितले की, ते कामासाठी बुधवारी सकाळी ८ वाजता बोगद्याच्या आत गेले होते. 24 तास काम करून गुरुवारी सकाळी ते बाहेर पडले.

बाहेर आल्यावर त्यांनी सांगितले की, बोगद्यात अडकलेले सर्व कामगार तुम्ही आम्हाला बाहेर कधी काढणार असा प्रश्न विचारत आहेत. सर्व कामगारांना बाहेर काढण्यासाठी सर्वजण काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. ऑगर मशीनने काम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. या मशिनने ड्रिलिंग करून पाईप आत टाकले जात आहेत. आत अडकलेले सर्व कामगार लवकरच बाहेर येतील अशी आशा आहे.

Uttarkashi Tunnel Collapse
Uttarkashi Tunnel Collapse: तब्बल ८० तासांनंतरही मजूर अडकलेलेच; रेस्क्यूसाठीचे अ‍ॅडव्हान्स मशीन्स बसवले; आज पूर्ण होणार ऑपरेशन?

सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी सुरू असलेले बचावकार्य केंद्र सरकारने हाती घेताच, आयटीबीपी आणि एनडीआरएफने सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी घेतली आहे. बोगद्याच्या तोंडावर केलेल्या बॅरिकेडिंगवर उत्तराखंड पोलिस आणि एसडीआरएफचे जवान तैनात होते. हे आता बोगद्यापासून सुमारे 150 मीटर अंतरावर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

त्याच वेळी, आयटीबीपीने बोगद्याला लागून असलेल्या मुख्य बॅरिकेडिंगची जबाबदारी घेतली आहे. जे पासशिवाय कोणालाही बोगद्यात जाऊ देत नाहीत. सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या 40 मजुरांना अन्न पुरवण्यासाठी 125 मिमी व्यासाचे 11 पाईप टाकले जात आहेत. जेणेकरुन त्यांच्यापर्यंत अधिक प्रमाणात खाद्यपदार्थ पोहोचवता येतील. यापूर्वी 80 मिमी व्यासाच्या पाईपद्वारे खाद्यपदार्थ पाठवले जात होते.(Latest Maharashtra News)

Uttarkashi Tunnel Collapse
Uttarkashi Tunnel Collapse: बोगद्यात अडकलेल्या मजूरांना वाचवण्यासाठी येणार 'हे' खास मशीन; आज पूर्ण होणार ऑपरेशन?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com