esakal | मराठीसह 11 भाषांमध्ये घ्या इंजिनिअरिंगचे शिक्षण, AICTEची मंजुरी
sakal

बोलून बातमी शोधा

Engineering Diploma Admission

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने All India Council for Technical Education (AICTE) 11 स्थानिक भाषांमध्ये बी. टेकच्या अभ्यासक्रमाला मंजुरी दिली आहे.

मराठीसह 11 भाषांमध्ये घ्या इंजिनिअरिंगचे शिक्षण, AICTEची मंजुरी

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- बी.टेक करु इच्छिणाऱ्या लाखो तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने All India Council for Technical Education (AICTE) 11 स्थानिक भाषांमध्ये बी. टेकच्या अभ्यासक्रमाला मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती, मल्याळम, बंगाली, आसामी, पंजाबी आणि उडिया या 11 भाषांमध्ये विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगचे शिक्षण घेता येणार आहे. (All India Council for Technical Education AICTE permits BTech programs in 11 regional languages Dharmendra Pradhan)

अनेक तरुणांच्या मनात इंजिनिअर होण्याचे स्वप्न असतं. पण, इंग्रजी भाषेमुळे तरुण इंजिनिअरिंगचा नाद सोडून देतात किंवा इंजिनिअरिंगला प्रवेश घेतल्यानंतर इंग्रजी डोक्यावरुन जात असल्याने मध्येच शिक्षण सोडून देतात. पण, आता स्थानिक 11 भाषांमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणं शक्य असल्याने तरुणांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे अधिक मोठ्या प्रमाणात विद्यार्थी इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ शकणार आहेत आणि आपलं स्पप्न साकार करु शकणार आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विट करुन म्हटलंय की, AICTE ने 11 स्थानिक भाषांमधील अभ्यासक्रमास मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रांतिक भाषेमध्ये तरुणांना शिक्षण देण्यासाठी प्रतिबद्ध आहेत. राष्ट्रीय शिक्षण नीतीनुसार विविध भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सशक्त करण्यासाठी या महत्त्वाच्या मुद्द्यावर जोर देण्यात आला आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आठ राज्यातील 14 इंजिनिअरिंग कॉलेजच्या नव्या शैक्षणिक वर्षांपासून निवडक शाखांमध्ये प्रांतिक भाषांमध्ये अभ्रासक्रम सुरु करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी म्हटलं की, यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होईल.

loading image