जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता; हाय अलर्ट जारी

वृत्तसंस्था
Friday, 16 August 2019

- लष्कर, हवाई दल आणि इतर सुरक्षा यंत्रणांना हाय अ‍लर्टच्या सूचना.

- काश्मीर व्हॅलीमधील सर्व शाळा, महाविद्यालये येत्या सोमवारपासून होतील सुरु.

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणला जाईल, अशी शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या भागातील लष्कर, हवाई दल आणि इतर सुरक्षा यंत्रणांना हाय अ‍लर्टच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मोदी सरकारने जम्मू-काश्मीरातील कलम 370 हटवल्यानंतर या भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसेच इंटरनेट, फोन कॉल्स यांसारख्या संपर्काच्या सर्व माध्यमांवर बंदी आणली होती. मात्र, मध्यरात्रीपासून हे निर्बंध उठवण्यात येणार आहेत. त्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये पाकपुरस्कृत दहशतवादी गटांकडून हा हल्ला घडविला जाण्याची शक्यता आहे. या शक्यतेनुसार या भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

दरम्यान, काश्मीर व्हॅलीमधील सर्व शाळा, महाविद्यालये येत्या सोमवारपासून सुरु होतील, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All Indian Army Air Force and Security Forces bases in Jammu and Kashmir asked to be on high alert