राजस्थानमध्ये राजकीय भूकंप! गेहलोत मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे राजीनामे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sachin pilot ashok gehlot

राजस्थानमध्ये राजकीय भूकंप! गेहलोत मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे राजीनामे

जयपूर: राजस्थानच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी रात्री आठच्या दरम्यान राजीनामे दिले आहेत. अशोक गेहलोत सध्या मुख्यमंत्री पदावर असून ते रात्री उशिरा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात फेरबदल होणार असून त्या पार्श्वभूमीवर हे राजीनामे दिले असल्याचं सांगण्यात आलंय तसेच सचिन पायलट यांच्याकडे राजस्थानची सूत्रे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राजस्थानच्या राजकारणात कमबॅक करण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचं म्हटलं जात होतं.

हेही वाचा: चीनला कडक प्रत्युत्तर! LACवर भारताकडून S-400 क्षेपणास्त्र लवकरच तैनात

याआधी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या दोन नेत्यांतील अंतर्गत वादातून पायलट यांनी आपल्या समर्थकांसह राजीनामा दिला होता. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापाठोपाठ ते भाजपमध्ये जातील अशी शक्यताही वर्तविली जात होती. मात्र, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी त्यांची समजूत काढली होत.

आज सायंकाळी गेहलोत यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी आपल्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलविली. या बैठकीत तासभर खलबते झाली. त्यांनतर त्यांनी सर्व मंत्र्यांना राजीनामा देण्याची सूचना केली. त्यानुसार सर्व मंत्री आपल्या पदाचा राजीनामा देतील असे सांगितले जात आहे.

हेही वाचा: संसदेपर्यंत ट्रॅक्टर मार्च निघणारच; अजून मागण्या बाकी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं

आधी तीन मंत्र्यांचा राजीनामा
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव मांडला होता. शिक्षण मंत्री गोविंद सिंह डोटासरा, आरोग्य मंत्री रघु शर्माआणि महसूल मंत्री हरिश चौधरी यांनी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून मंत्रिपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. याच पत्रांना राजीनामा मानला जात होता. राजस्थानचे प्रभारी अजय माकन यांनी जयपूरला पोचताच तीन मंत्र्यांनी राजीनामे दिल्याचे सांगितले.


पत्रकारांशी बोलताना माकन म्हणाले की, ३० जुलै रोजी काही मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या तेव्हा काहींनी राजीनामे देण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यांनी पक्ष संघटनेत काम करण्याचे म्हटले होते. त्यात गोविंद सिंह डोटासरा, हरीश चौधरी आणि रघु शर्मा या तीन मंत्र्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहले आहे. पक्षासाठी काम करणार असल्यानेच त्यांनी पद सोडण्याची तयारी दाखविली असल्याचे माकन म्हणाले होते. कॉंग्रेसमध्ये एक व्यक्ती एक पद असा फॉर्म्युला लागू होणार असल्याचे सांगितले.

loading image
go to top