संसदेच्या अधिवेशनाआधी होणार सर्वपक्षीय बैठक; PM मोदी राहणार उपस्थित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parliament

संसदेच्या अधिवेशनाआधी होणार सर्वपक्षीय बैठक; PM मोदी राहणार उपस्थित

नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी सर्व पक्षीय बैठक आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. येत्या रविवारी म्हणजेच 28 नोव्हेंबर रोजी ही बैठक होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या बैठकीला पंतप्रधान मोदी देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: देशमुख आणि सिंह यांच्यातील वादावर 'SC' ने व्यक्त केली चिंता

संसदेचं हिवाळी अधिवेशन 29 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. ही बैठक रविवारी सकाळी 11 वाजता होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी भाजपच्या संसदीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. कृषी कायदे रद्द करण्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

loading image
go to top