
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी गांधीजींचा एक खास व्हिडिओ शेअर करत त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले आहे.
Mahatma Gandhi : प्रियांकांनी शेअर केली गांधीजींची सुंदर आठवण; व्हिडिओ बघाच!
नवी दिल्ली : देशाचे राष्ट्रपीता महात्मा गांधी यांची आज (ता. 30) 72वी पुण्यतिथी. 30 जानेवारी 1948 दिल्लीच्या बिर्ला भवन बागेत प्रार्थना सभा संपवून निघताना नथुराम गोडसेने त्यांची गोळी मारून हत्या केली. पण स्वातंत्र्यासाठी लढलेल्या या महात्म्याच्या आठवणी व आदर आजही देशवासियांच्या मनात आहे. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देशभरातून गांधीजींना श्रद्धांजली वाहिली जात आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही गांधीजींचा एक खास व्हिडिओ शेअर करत त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले आहे.
स्वच्छता, जलसाक्षरता आणि गांधीविचार
इंदिरा गांधींची नात व काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी एक खास व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत साधारण एक वर्षाच्या बाळाला चक्क गांधीजी खेळवत आहेत, असा तो व्हिडिओ आहे. गांधीजी त्या बाळाला मांडीवर घेऊन खेळवत आहेत, हासवत आहेत. ते बाळही छान हासतंय, उड्या मारतंय. या व्हिडिओला प्रियांका यांनी 'बापू तुम जिंदा हो, खेतों में खलिहानों में न्याय, सत्य और प्रेम के अरमानों में' असे कॅप्शन दिले आहे. मात्र, हे बाळ कोण आहे, हे माहीत नाही.
हा व्हिडिओ आज प्रियांका यांनी ट्विटरवर शेअर केल्याने गांधीजींच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
प्रियांकासह सर्वच पक्षांच्या बड्या नेत्यांनी गांधीजींना सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण केली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही गांधीजींचे समाधीस्थळ राजघाट येथे जाऊन श्रद्धांजली अर्पण केली.