esakal | ‘बिग बास्केट’वर सायबर हल्ला; दोन कोटी भारतीयांची खासगी माहिती लीक
sakal

बोलून बातमी शोधा

‘बिग बास्केट’वर सायबर हल्ला; दोन कोटी भारतीयांची खासगी माहिती लीक

‘बिग बास्केट’वर सायबर हल्ला; दोन कोटी भारतीयांची खासगी माहिती लीक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बंगळुरू स्थित ‘बिग बास्केट’ या ऑनलाइन किराणा माल विकणाऱ्या कंपनीवर सायबर अटॅक झाला असून सुमारे दोन कोटी ग्राहकांची माहिती लीक झाली आहे. लीक झालेल्या माहितीमध्ये युजर्सचं नाव, फोन नंबर, पत्ता, ई मेल आणि जन्मतारीख यांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.

ShinyHunters या हॅकरने Big Basket चा डेटाबेस पब्लिश केल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे, लीक झालेली ही माहिती कोणीही सहज डाउनलोड करु शकतं, असं Techcrunchच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

भारतीय सायबर सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर राजहरिया यांनीदेखील याविषयी ट्विट करुन माहिती दिली आहे. विशेष म्हणजे २०२० मध्येदेखील बिग बास्केटवरील माहिती लीक झाली होती. सध्या लीक झालेली माहिती कोणीही सहज डाउनलोड करु शकतं. परंतु, याविषयी बिग बास्केटकडूने कोणतंही स्टेटमेंट दिलेलं नाही.

दरम्यान, बिग बास्केट ही खरेदीसाठी ग्राहकांमध्ये लोकप्रिय असलेली ऑनलाइन कंपनी आहे. २०११ मध्ये सुरु झालेल्या या कंपनीमध्ये चीनच्या अलीबाबा या कंपनीची भागीदारी आहे.

loading image
go to top