
Aluva Rape Murder Case: केरळ न्यायालयाने POCSO (लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा) अंतर्गत आज (मंगळवार) एर्नाकुलम जिल्ह्यातील अलुवा येथे पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली. बालदिनानिमित्त न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला. विशेष म्हणजे 2012 मध्ये याच दिवशी POCSO कायदाही लागू करण्यात आला होता. त्याच कायद्याअंतर्गत आज न्यायालयाने शिक्षा सुनावली.
एर्नाकुलममध्ये अश्वक आलम नावाच्या बिहारच्या तरुणाने 28 जुलै रोजी मुलीवर बलात्कार करून तिची गळा आवळून हत्या केली होती. त्यानंतर मृतदेह गोणीत बांधून कचऱ्यात फेकून दिला. घटनेच्या 100 व्या दिवशी 4 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने अश्वकला दोषी ठरवले आणि आज त्याला फाशीची शिक्षा सुनावली. (Latest Crime News)
आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा पीडितेचे आई-वडील न्यायालयात हजर होते. हे प्रकरण घृणास्पद आहे, त्यामुळे दोषीला फाशीची शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता.
शिक्षेवरील युक्तिवादादरम्यान अश्वक आलमने न्यायालयात दावा केला होता की इतर आरोपींना सोडून देण्यात आले होते आणि केवळ त्यालाच या प्रकरणात पकडण्यात आले होते. याशिवाय अन्य कोणताही युक्तिवाद त्यांनी केला नाही.
कोर्टाने आरोपपत्रात आरोपी अश्वक आलमला सर्व 16 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले आहे. आरोपीने 28 जुलै रोजी मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिचा गळा दाबून खून केला. आरोपींनी मुलीचा मृतदेह अलुवा येथील परिसरात फेकून दिला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली होती, असे आरोपीने म्हटले आहे.
POCSO विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. सोमण यांनी बिहारमधील 28 वर्षीय मजुराला फाशीची शिक्षा सुनावली. या खळबळजनक प्रकरणाची सुनावणी 100 दिवसांत पूर्ण झाली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षा व्हायला हवी, असा युक्तिवाद तक्रारदार पक्षाच्या वतीने करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.