पत्नी बनवायची इन्स्टा रील्स, अश्लील कमेंट्स पाहून वैतागलेल्या पतीने संपवलं जीवन; live करत म्हणाला, तुमच्या घरी...

मायाला सोशल मीडियावर रील बनवण्याची आवड होती. जेव्हा ती रील बनवायची आणि ती इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर पोस्ट करायची तेव्हा लोक रीलवर अश्लील कमेंट करायचे. सिद्धार्थला पत्नीच्या रीलवरील अश्लील कमेंट्स अजिबात आवडल्या नाहीत. यावरून माया आणि सिद्धार्थमध्ये वाद सुरू झाला.
viral video
viral videoEsakal

आजकाल सर्वांनाच रील्स बनवायला, पाहायला आवडतं. आपल्याला रील आवडलं तर आपण ते सेव्ह करतो, लाईक करतो, त्यावर कमेंट करतो मात्र, अशाच एका रीलवरील कमेंटमुळे एक कुटुंब उध्दस्त झाल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अलवरमध्ये पत्नीने रील बनवल्याने नाराज झालेल्या पतीने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली आहे. पतीने अनेकवेळा पत्नीला रील बनवण्यास मनाई केली होती पण ती ऐकत नव्हती.

या प्रकरणावरून दोघांमध्ये वाद वाढू लागला. भांडण झाल्यावर पत्नी घर सोडून माहेरी गेली. यावरून घरात वादही सुरू होता. निराश झालेल्या पतीने आत्महत्या केली. मरण्यापूर्वी पतीने सोशल मीडियावर लाइव्ह जात पत्नीच्या रीलवर अश्लील कमेंट करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच कुटुंबात सुरू असलेल्या वादाची माहिती दिली.

viral video
Stalin Youtuber Row: CM स्टॅलिन यांच्यावर टीका करणाऱ्या युट्यूबरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा! कोर्टानं म्हटलं, निवडणुकीच्या तोंडावर...

रैनी पोलीस स्टेशन हद्दीतील नांगलबास गावात राहणारा सिद्धार्थ हा दौसा येथील आरोग्य विभागात एलडीसी (लोअर डिव्हिजन क्लर्क) म्हणून कार्यरत होता. दीड वर्षांपूर्वी वडिलांच्या जागी त्याला नोकरी लागली. सिद्धार्थचा विवाह माया नावाच्या मुलीशी झाला. सिद्धार्थने ५ एप्रिल रोजी आत्महत्या केली होती. 6 एप्रिल रोजी कुटुंबीयांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.

मायाला सोशल मीडियावर रील बनवण्याची आवड होती. जेव्हा ती रील बनवायची आणि ती इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर पोस्ट करायची तेव्हा लोक त्यांच्यावर अश्लील कमेंट करायचे. सिद्धार्थला पत्नीच्या रीलवरील करण्यात आलेल्या अश्लील कमेंट्स अजिबात पटत नव्हत्या. यावरून माया आणि सिद्धार्थमध्ये वाद सुरू झाला. सिद्धार्थ आणि माया यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे.

viral video
Viral Video: ज्याच्या विरोधात प्रचार करायला आले राहुल गांधी, बॅनरमध्ये त्याचाच फोटो; काँग्रेसचा मोठा गोंधळ

सिद्धार्थने मायाला रील बनवण्यास मनाई केली. पण मायाला ते मान्य नव्हते. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद वाढू लागल्यावर माया घर सोडून आई-वडिलांच्या घरी गेली आणि सिद्धार्थवर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली. सिद्धार्थला दारू पिण्याचे व्यसन जडले असून त्यामुळे त्यांच्यातील वाद वाढू लागला असल्याचे सांगितले.

आत्महत्या करण्यापूर्वी सिद्धार्थ सोशल मीडियावर लाईव्ह आला यावेळी त्याने त्याच्या पत्नीच्या व्हिडिओवर कमेंट करणाऱ्यांना सुनावलं आहे. जेव्हा तुमच्या घरी असे घडेल तेव्हा तुम्हाला समजेल. सिद्धार्थचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत आहे. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.

viral video
Manipur Lok Sabha Campaign: मणिपूरमध्ये प्रचारातही भीतीचं सावट कायम! सार्वजनिक सभा नाही, इन कॅमेरा बैठकांवर भर

पोलिस अधीक्षक (एसपी) आनंद शर्मा यांनी सांगितले की, कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर माध्यमांद्वारे समोर आलेल्या व्हिडिओमध्ये या प्रकरणाचा तपास केला जात आहे. याबाबत कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तर मृताची पत्नी आणि मुलांचीही चौकशी करण्यात आली आहे. सोशल मीडियाचे अकाउंटही तपासले जात आहेत.

viral video
दोन डोग्रा राजपुतांमध्ये लढाई; उधमपूर लोकसभा मतदारसंघात १६.२३ लाख मतदार १२ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील, लक्षवेधी लढत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com