'नेहमीच मला अग्निपरिक्षा द्यावी लागली', येडियुरप्पा झाले भावूक

महाराष्ट्रा शेजारच्या कर्नाटकात राजकीय भूकंप येडियुरप्पांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा.
 Yediyurappa
Yediyurappaesakal

बंगळुरु: मागच्या एक-दोन महिन्यांपासून सुरु असलेली चर्चा अखेर खरी ठरली आहे. बी.एस. येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी सोमवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. येडियुरप्पा यांच्या सरकारला दोन वर्ष पूर्ण होत असतानाच, त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा (cm post) राजीनामा दिलाय. रविवारीच त्यांनी २६ जुलैला मी माझ्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात निर्णय घेईन, असे स्पष्ट केले होते. "उद्या काय होते ते पाहू. मला हायकमांडकडून (highcommand) अजून निर्देश मिळालेले नाहीत" असे येडियुरप्पा यांनी रविवारी म्हटले होते. भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा (jp nadda) यांनी येडियुरप्पा चांगले काम करत असल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले होते. (Always been through agni pariksha BS Yediyurappa dmp82)

राजीनामा दिल्यानंतर विधानसौधमध्ये बोलताना येडियुरप्पा म्हणाले की, मला माझ्या कारकिर्दीमध्ये नेहमीच अग्निपरिक्षा द्यावी लागली आहे. "एकापाठोपाठ एक मी अग्निपरिक्षेचा सामना केलाय, तरी सुद्धा मी माझे काम करत राहिलो. सरकारी कर्मचारी, मुख्य सचिव यांचे आभार कसे मानू, ते मला समजत नाहीय. त्यांनी खूप मेहनत केली. माझ्यावर विश्वास ठेवला. त्यांच्यामुळेच कर्नाटकाचा विकास करता आला" असे येडियुरप्पा म्हणाले.

 Yediyurappa
मुंबईतल्या धनवान लोकांनो, आता पूरग्रस्तांना मदत करा- संजय राऊत

"लोकांचा आपल्यावरचा विश्वास उडालया हे मी अधिकारी आणि आमदारांना सांगितलं होतं. आपल्याला स्वच्छ, पारदर्शकपणे मेहनत करावी लागेल. अनेक अधिकारी प्रामाणिक आहेत. सगळ्यांनीच तसे असले पाहिजे. बंगळुरुला एक जागतिक दर्जाचे शहर बनवलं" असे येडियुरप्पा म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com