पंजाबमध्ये फटाक्यांसाठी दोनच तास; अमरिंदर यांचा निर्णय

वृत्तसंस्था
Thursday, 12 November 2020

दिवाळी आणि गुरुपुरब या सणांना केवळ दोन तासांसाठी फटाके वाजवण्यास मुभा असेल. महत्त्वाचे म्हणजे केवळ हरित फटाके वाजविता येतील. मुख्यमंत्री कॅप्टन अमरींदर सिंग यांनी हा निर्णय जाहीर केला.

चंडीगढ - वाढत्या प्रदुषणावर उपाय म्हणून पंजाबने फटाक्यांवर निर्बंध घातले आहेत. दिवाळी आणि गुरुपुरब या सणांना केवळ दोन तासांसाठी फटाके वाजवण्यास मुभा असेल. महत्त्वाचे म्हणजे केवळ हरित फटाके वाजविता येतील. मुख्यमंत्री कॅप्टन अमरींदर सिंग यांनी हा निर्णय जाहीर केला. मंगळवारी मध्यरात्रीपासून निर्बंध लागू झाले असून ते 30 नोव्हेंबर-एक डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू असतील. मंडी गोविदगढ येथे पूर्ण बंदी असेल. नाताळच्यावेळी सुद्धा हे निर्बंध कायम असतील.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रीय हरित लवादाने हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम असलेल्या शहरे तसेच गावांमध्ये केवळ हरित फटाक्यांना परवानगी दिली असून मर्यादीत वेळ ठेवली आहे. सणाच्या कालावधीत हवा गुणवत्ता निर्देशांकाचे निरीक्षण करावे अशा सूचना या क्षेत्रातील राज्यांचे मुख्य सचिव तसेच पोलीस महासंचालकांना देण्यात आल्या आहेत.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हरित फटाक्यांचा फायदा
हरित फटाक्यांमध्ये बेरीयम नायट्रेट हे धातूचे ऑक्साइड नसते. त्यामुळे हवा तसेच आवाजाचे प्रदुषण होत नाही. पारंपरिक फटाक्यांच्या तुलनेत हरित फटाक्यांमुळे विषारी वायूचे उत्सर्जन 30 टक्के कमी होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amarinder decision Two hours for firecrackers in Punjab