esakal | Punjab: माझा अपमान झाल्याचे जगाने पाहिले - अमरिंदर सिंग
sakal

बोलून बातमी शोधा

Amarinder Singh

माझा अपमान झाल्याचे जगाने पाहिले - अमरिंदर सिंग

sakal_logo
By
सुधीर काकडे

पंजाबमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळात काँग्रेस पक्षात रोज नवीन घडामोडी घडता आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि काँग्रेसनेते नवजोत सिंग सिद्धू यांच्यातील वाद शिगेला पोहोचल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजलेली पाहायला मिळते आहे. पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना भाजपला मदत होईल असे वागू नका, असे म्हणत त्यांच्या भुमिकेवर प्रश्न उपस्थित केला. त्यावर आता अमरिंदर सिंग यांनी लगेचच प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळते आहे.

हेही वाचा: Punjab : भाजपचे मदतनीस बनू नका; हरीश रावतांचा अमरिंदर सिंगांवर निशाणा

अमरिंदर सिंग यांनी रावत यांना उत्तर देताना, माझा अपमान झाल्याचे जगाने पाहिल्याचे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. काँग्रेसने आपल्याबद्दल घेतलेली भुमिका आणि त्यामुळे झालेला अपमान सर्वांनी पाहिला. तरीही रावत उलट माझ्याबद्दल असे भाष्य करत आहेत. जर हा माझा अपमान नव्हता तर काय होते? असा प्रश्न यावेळी अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केला आहे.

loading image
go to top