अंबानी, अदानी यांची पूजा करा; भाजप खासदाराचा अजब सल्ला | KJ Alphons | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

K.J.Alphons

अंबानी, अदानी यांची पूजा करा; भाजप खासदाराचा अजब सल्ला

नवी दिल्ली : रिलायन्स असो, अंबानी किंवा अदानी आणि इतरांची पूजा केली पाहिजे. त्यांचा सन्मान करायला हवा. कारण ते या देशातील लोकांना रोजगार देत आहेत, असा अजब तर्क भारतीय जनता पक्षाचे (BJP) राज्यसभा खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री के.जे. अल्फोन्स (K.J.Alphons) यांनी दिला आहे. गुरुवारी (ता.दहा) राज्यसभेतील अर्थसंकल्पीय चर्चेत ते बोलत होते. अल्फोन्स म्हणाले, तुम्ही माझ्यावर भांडवलदारांचे प्रवक्ते असण्याचा आरोप करु शकता. कोणताही व्यक्ती या देशात रोजगार निर्माण करतो, ते मग रिलायन्स असो, अंबानी, अदानी असो किंवा आणखीन कोणी असो त्यांची पूजा करायला हवी. कारण ते रोजगार देतात. त्यांच्या या वादग्रस्त विधानावर राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झासह (Manoj Jha) विरोधी नेत्यांनी विरोध नोंदविला. (Ambani, Adani Worshipped Because They Create Jobs BJP Alphons)

हेही वाचा: कॅनडातील आंदोलन करणारे ट्रकचालक आक्रमक, पंतप्रधानांचा मागितला राजीनामा

विरोध करणाऱ्यांना अलफोन्स म्हणाले, आपण रोजगार निर्माण करित नाही. जे पैसे गुंतवणूक करतात.. अंबानी, अदानी तो प्रत्येक व्यावसायिक जो पैसे गुंतवणूक करतात ते रोजगार निर्माण करतात. भाजप सदस्य म्हणतात, त्यांनी कधीही अंबानींबरोबर काॅफी घेतलेली नाही. मात्र ते आपल्या दाव्यांचे समर्थन करतात. देशातील प्रत्येक प्रामाणिक माणूस जो रोजगार निर्माण करतात, त्यांचा सन्मान करायला हवा. त्याची चर्चा व्हायला हवी.

हेही वाचा: आई-वडिलांची जबाबदारी न घेणाऱ्या मुलाला दणका! ७ हजारांची पोटगी देण्याचे आदेश

विरोधी पक्षांचे आरोप फेटाळले

बेरोजगारीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या सात वर्षांमध्ये गरिबांसाठी खर्च केला आहे. सरकारने विकास योजना, दवाखाने आणि आरोग्य सुविधांचे निर्माण केले आहे. यातून रोजगाराची संधी निर्माण करते.

Web Title: Ambani Adani Worshipped Because They Create Jobs Bjp Alphons

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..