श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडच्या पेद्दार भागात १४ ऑगस्टला विनाशकारी ढगफुटीच्या संकटात अथक सेवा देत रुग्णवाहिकाचालक अरिफ रशीद याने ५० पेक्षा जास्त जणांना जीव वाचविला.
मचैल यात्रेदरम्यान ढगफुटी होऊन अचानक मोठा पूर आला. यात सुमारे ७५ जण मृत्युमुखी पडले. यात्रामार्गावर आपत्कालीन सेवेसाठी अरिफ गुरुवारी (ता.१४) नेहमीप्रमाणे तैनात होता. त्याचदिवशी दुपारी ढगफुटी होऊन डोंगरावरून चिखल, दगड आणि मातीचे ढिगारे खाली येऊ लागले.