American Airlines : पुन्हा एकाने दुसऱ्यावर केली लघुशंका; न्यूयॉर्कवरुन दिल्लीत आलेल्या विमानातील घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

American Airlines

American Airlines: पुन्हा एकाने दुसऱ्यावर केली लघुशंका; न्यूयॉर्कवरुन दिल्लीत आलेल्या विमानातील घटना

Passenger Urinated In American Flight : अमेरिकन एअरलाईन्सची न्यूयॉर्क ते दिल्ली या फ्लाईटमध्ये एका प्रवाशाने सहप्रवाशावर लघुशंका केल्याची घटना घडली आहे. दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर सदरील तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

ही घटना AA292 या अनेरिकन एअरलाईन्सच्या फ्लाईटमध्ये घडली आहे. या फ्लाईटने शुक्रवारी सव्वा नऊ वाजता न्यूयॉर्कवरुन उड्डाण घेतलं. १४ तासांच्या प्रवासानंतर शनिवारी ४ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजता हे विमान दिल्लीतल्या आयजीआय एअरपोर्टवर उतरलं.

घटनेतला आरोपी हा अमेरिकेतल्या एका विद्यापीठात शिक्षण घेतो. प्रवासादरम्यान नशेमध्ये असतांना त्याने सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप आहे. त्याननंतर त्या सहप्रवाशाने त्याची तक्रार केली.

हेही वाचाः तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

सूत्रांच्या माहितीनुसार लघुशंका केलेल्या या विद्यार्थ्याने माफी मागितली आहे. त्यामुळे पीडित प्रवाशाने सदरील विद्यार्थ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली नाही. कारण त्याच्या करिअरवर परिणाम होऊ नये म्हणून त्याने हा निर्णय घेतला. सदरील विद्यार्थ्याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं.

यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात अशीच घटना घडली होती. नशेमध्ये असलेल्या शंकर मिश्रा नावाच्या व्यक्तीने न्यूयॉर्कवरुन दिल्लीचा जात असलेल्या एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये एका वयस्क महिलेवर लघुशंका केली होती. या घटनेच्या महिन्याभरानंतर मिश्राच्या विरोधात गुन्हा नोंद झाला होता. आता अशीच घटना अमेरिकन एअरलाईन्समध्ये घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

विमानात घडलेल्या प्रकारामुळे आम्ही या प्रवाशाला त्याचा परतीचा प्रवास आणि आमच्या फ्लाइटमधील भविष्यातील प्रवास रद्द करणार आहोत, असं अमेरिकन एअरलाईन्सने म्हटलं आहे.

टॅग्स :america