Amethi Constituency Election Result: अमेठीत स्मृती इराणी पराभूत; काँग्रेसने घेतला राहुल गांधींचा पराभवाचा बदला..

Amethi Lok Sabha Election Result 2024 Bhartiya Janta Party Smriti Irani And Kishori Lal Sharma: काँग्रेसच्या के एल शर्मा यांचा अमेठी लोकसभा मतदारसंघामध्ये विजय झाला आहे. तर स्मृती इराणी यांचा पराभव झाला आहे.
Amethi Constituency Election Result
Amethi Constituency Election ResultEsakal

Amethi Constituency Lok Sabha Election Result: लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. अमेठीमध्ये काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांचा विजय झाला आहे तर भाजपच्या स्मृती इराणी यांचा पराभव झाला आहे.

काँग्रेसचा हक्काचा असलेल्या या मतदारसंघामध्ये बीजेपीच्या स्मृती इराणींविरुद्ध (Smriti Irani) यावेळी काँग्रेसचे निष्ठावंत नेते के एल शर्मा उभे राहिले होते. याशिवाय बहुजन समाजवादी पार्टीकडून नन्हें सिंह चौहान (Nanhe Singh Chauhan) उभे आहेत. याशिवाय अपक्ष म्हणून चंद्रवती(Chandravati), जगदंबा प्रसाद यादव (Jagdamba Prasad Yadav), खुशीराम (Khushiram), सुरेंद्र कुमार (Surendra Kumar), उदयराज (Udayraj) हे उमेदवार होते.

निवडणुकीत दबदबा कुणाचा ?

१९६७ पासून २०१४ च्या निवडणुकीपर्यंत काँग्रेसचा अमेठी मतदारसंघावर दबदबा होता. या मतदारसंघात काँग्रेस कायमच जिंकत आलीये काँग्रेसने आतापर्यत १३ वेळा ही सीट जिंकली आहे. पण २०१९ च्या निवडणुकीत हे चित्र पालटलं. स्मृती इराणी विरुद्ध राहुल गांधी या लढतीमध्ये राहुल गांधी पराभूत झाले होते.

त्यामुळे राहुल गांधी यांनी अमेठी मतदारसंघ न निवडता लोकसभा निवडणुकीसाठी रायबरेली मतदारसंघाची निवड केली. त्यामुळे स्मृती इराणी विरुद्ध काँग्रेसचे निष्ठावंत के एल शर्मा अशी लढत पाहायला मिळणार आहे.

२०१९ मध्ये झालेली काँग्रेसची हार लक्षात घेता यंदाही स्मृती इरानीच जिंकणार असल्याचं चित्र एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळतंय.

स्मृती इराणींची राजकीय पार्श्वभूमी

मूळच्या दिल्लीच्या असलेल्या स्मृती यांनी मॉडेलिंगमध्ये करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री म्हणून मालिकांमध्ये काम केलं. त्यांची 'क्यूँकी सास भी कभी बहू थी' ही मालिका खूप गाजली. या मालिकेत त्यांनी साकारलेली तुलसी लोकप्रिय ठरली.

करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असतानाच स्मृती यांनी राजकारणात प्रवेश केला. २००३ मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. महाराष्ट्र युवा संघाचं त्यांनी काही काळ नेतृत्व केलं त्यानंतर त्यांची कामगिरी बघून पक्षाने त्यांच्यावर आणखी जबाबदाऱ्या सोपवल्या. २००४ मध्ये त्यांनी पहिली निवडणूक लढवली. २०१४ मध्ये त्या राहुल गांधीविरोधात निवडणूक अमेठीत हरल्या पण २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी राहुल गांधींना पराभूत केलं.

कोण आहेत किशोरी लाल शर्मा?

काँग्रेसचे उमेदवार किशोरी लाल शर्मा हे गांधी कुटूंबाचे निकटवर्तीय मानले जातात. ते मूळचे लुधियाना पंजाबचे असून त्यांनी राजीव गांधी यांच्यासोबत १९८३ च्या निवडणुकीत बरंच काम केलंय. इतकंच नाही तर राजीव यांच्या मृत्यूनंतर किशोरी लाल यांनी गांधी कुटूंबाची राजकारणात बरीच मदत केली. सोनिया गांधींची के एल शर्मा यांनी वेळोवेळी मदत केली असून अमेठी आणि रायबरेली मतदारसंघांची जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली आहे.

२०१९ च्या निवडणुकीचा निकाल

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी पराभूत झाले तर स्मृती इराणी विजयी झाल्या. स्मृती यांना ४,६८,५१४ मत मिळाली तर राहुल गांधी यांना ४,१३,३९४ इतकी मते पडली. अवघ्या ५५,१२० इतक्या कमी फरकाने राहुल गांधी ही निवडणूक हरले होते.

प्रचारासाठी मोदी, अमित शहांची पाठ तर प्रियांका गांधींची साथ

स्मृती इराणी विरुद्ध के एल शर्मा ही जोरदार लढत अमेठी मतदार संघात असताना मोदींनी मात्र या मतदार संघाकडे पाठ फिरवली. बीजेपीच्या इतर नेत्यांनी इथे येऊन सभा घेतल्या पण पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा इथे फिरकले नाहीत.

भाजपच्या मुख्य नेत्यांनी स्मृती यांच्याकडे जरी पाठ फिरवली असली तरीही के एल शर्मा यांच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी मैदानात उतरल्या आणि त्यांनी स्मृती यांच्याविरोधात जोरदार प्रचार केला.

नक्की निकाल कोणाच्या बाजूने ?

यावेळी अमेठी मतदारसंघात खासदारकी साठी काटे कि टक्कर पाहायला मिळणार आहे. काही एक्झिट पोलच्या मते स्मृती इराणी जिंकतील तर काही एक्झिट पोल्सनी नक्की कोण जिंकणार हे सांगू शकत नाही असा दावा केलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com