esakal | आसामसह आठ राज्यात पावसाचं थैमान; आतापर्यंत ४७० बळी
sakal

बोलून बातमी शोधा

Amid Covid, monsoon fury in 8 states leaves 470 dead

देशात कोरोनाचे मोठे संकट असतानाच पुराचेही संकट ओढावले आहे. देशातील आठ राज्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले असून आतापर्यंत पावसाने एकूण बळींचा आकडा ४७० वर पोहोचला आहे. या मुसळधार पावसाचा सर्वात जास्त फटका पश्चिम बंगाल, गुजरात व आसाम या राज्यांना बसला आहे. 

आसामसह आठ राज्यात पावसाचं थैमान; आतापर्यंत ४७० बळी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे मोठे संकट असतानाच पुराचेही संकट ओढावले आहे. देशातील आठ राज्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले असून आतापर्यंत पावसाने एकूण बळींचा आकडा ४७० वर पोहोचला आहे. या मुसळधार पावसाचा सर्वात जास्त फटका पश्चिम बंगाल, गुजरात व आसाम या राज्यांना बसला आहे. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मागील काही दिवसांपासून देशातील काही राज्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तेथील काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांत पुराच्या पाण्याने हाहाकार माजला आहे. यंदाच्या वर्षी पावसाळ्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्या राज्यात सुमारे १४२ लोकांचा मुसळधार पावसाने बळी घेतला, तसेच काही लोक बेपत्ता आहेत. पावसामुळे आसाममध्ये १११ जणांचा, तर गुजरातमध्ये ८१ लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात ४६, तर उत्तर प्रदेशमध्ये ४४ लोकांना आपला जीव गमवावा लागला.

दरम्यान, गेल्या वर्षीही मुसळधार पावसामुळे देशातील काही भागात मोठे नुकसान झाले होते. या नैसर्गिक संकटापासून लोकांचा बचाव करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ)ची पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. त्यांनी तिथे मदतकार्यास सुरुवातही केली. एनडीआरएफची ७०हून अधिक पथके देशातील विविध भागांत मदतीसाठी पाठविण्यात आली आहेत. एनडीआरएफचे पूरग्रस्त आसाम आणि बिहारमध्ये मदत आणि बचाव चालू आहे.

आसाममधील २४ जिल्ह्यांमध्ये २५ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. त्यात गोलपाडा येथील साडेचार लाख लोकांचा समावेश आहे.बारपेटामध्ये ३.४४ लाख, तर मोरीगाव येथे ३.४१ लाखांहून अधिक लोकांना पावसाचा फटका बसला आहे. मुसळधार पाऊस व पूर यामुळे आसाममधील काझीरंगा अभयारण्यातील प्राण्यांच्या जिवालाही मोठा धोका निर्माण झाला आहे.