
यासिन मलिकवरुन अमित मिश्रानं शाहीद अफ्रिदीला सुनावलं; केली बोलती बंद
नवी दिल्ली : टेरर फंडिंगप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला काश्मीरमधील फुटिरतावादी नेता यासिन मलिकबद्दल पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहीद अफ्रिदीनं ट्वीट करुन कळवळा व्यक्त होता. पण याच अफ्रिदिला आता भारताचा फिरकीपटू अमित मिश्रा यानं आपल्या स्टाईलमध्ये क्लीनबोल्ड केलं आहे. (Amit Mishra lashes out on Shahid Afridi who gets side of Yasin Malik)
हेही वाचा: यासिन मलिकच्या समर्थकांकडून श्रीनगरमध्ये जाळपोळ, दगडफेक
एनआयए कोर्टानं यासिन मलिकला दोषी ठरवताच शाहिद आफ्रिदीने ट्विट केलं होतं. "भारतात मानवी अधिकारांच्या दडपशाहीविरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबण्याचे काम सातत्याने सुरू आहे. यासिन मलिकविरूद्ध खोटे आरोप लावून काश्मीरचा स्वातंत्र्याबद्दलचा संघर्ष थांबणार नाही. मी विनंती करतो की, संयुक्त राष्ट्रांनी काश्मिरी नेत्यांविरूद्ध सुरू असलेल्या खोट्या अन्यायकारक कायदेशीर खटल्यांची दखल घ्यावी"
अफ्रिदीच्या याच ट्विटला टॅग करत अमित मिश्रानं त्याला चांगलचं सुनावलं आहे. अमित मिश्रानं ट्विट केलं, "प्रिय शाहीद अफ्रिदी, यासिन मलिकनं स्वतः कोर्टात आपला गुन्हा कबूल केला आहे. प्रत्येकजण तुझ्या जन्मतारखेप्रमाणं दिशाभूल करण्याचं काम करत नाहीत"
मिश्रानं अफ्रिदीला का लगावला टोला?
शाहिद अफ्रिदीनं १६ वर्षांचा असताना ३७ चेंडूंमध्ये शतक ठोकल्याचा दावा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून करण्यात येत होता. पण प्रत्यक्षात तो त्यावेळी १९ वर्षांचा होता. आपल्या गेम चेंजर पुस्तकात अफ्रिदीनं स्वतः हा खुलासा केला आहे. माझा जन्म सन १९७५ मधला असल्यानं आपल्या वयाची चुकीची नोंद झाल्याचं त्यांनी पुस्तकातून स्पष्ट केलं होतं.
Web Title: Amit Mishra Lashes Out On Shahid Afridi Who Gets Side Of Yasin Malik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..