
गुवाहाटी : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् त्यांच्या दिवंगत मातुःश्रीविषयी बिहारमध्ये काढण्यात आलेल्या ‘वोटर अधिकार यात्रे’दरम्यान अपशब्द वापरण्यात आले. त्याबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे,’’ अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केली.