esakal | दहशतवाद्यांचे दिवस भरले, अमित शहांचा मास्टरप्लान तयार
sakal

बोलून बातमी शोधा

amit shah

दहशतवाद्यांचे दिवस भरले, अमित शहांचा मास्टरप्लान तयार

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: काश्मीरमध्ये (Kashmir) दहशतवाद्यांनी शाळेत घुसून केलेल्या हत्यांची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. निर्दोष, निष्पाप आणि अल्पसंख्यांकांची हत्या करणाऱ्यांना त्याच भाषेत चोख प्रत्युत्तर देण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amti shah) यांनी दिले आहेत. पाकिस्तान (pakistan) पुरस्कृत दहशतवादाची स्थानिक मॉड्युल (local module) मोडून काढण्यासाठी केंद्राने दहशतवादाविरुद्ध लढण्यात पारंगत असलेल्या अधिकाऱ्यांना खोऱ्यात पाठवलं आहे.

काश्मीर खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची केंद्राने गंभीर दखल घेतली आहे. गृहमंत्री अमित शाहा यांची काश्मीरप्रश्नावर गुरुवारी अधिकाऱ्यांसोबत तब्बल पाच तास बैठक चालली. पाकिस्तानातील लष्कर-ए-तय्यबाचा भाग असलेल्या टीआरएफच्या अतिरेक्यांनी मागच्या काही दिवसात श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ले केले आहेत. एक काश्मिरी पंडित, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि अन्य दोघांची हत्या केली आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: उद्या जाहीर सभेत गौप्यस्फोट करण्याचा नारायण राणेंचा इशारा

दहशतवाद विरोधी लढ्यात पारंगत असलेले इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख तपन देका काश्मीर खोऱ्यात जाणार आहेत. स्वत: ते लक्ष घालणार आहेत. अन्य सुरक्षा यंत्रणांच्या सीटी टीम्स आधीच काश्मीरमध्ये दाखल झाल्या आहेत. काश्मीरमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येत असताना हे दहशतवादी हल्ले सुरु झाले आहेत. काश्मीर खोऱ्यातील सर्व हॉटेल्समध्ये १०० टक्के बुकिंग झाले आहे. आर्थिक घडामोडींना वेग येत असताना असे हल्ले होत आहेत.

loading image
go to top