Amit Shahsakal
देश
Amit Shah: सहकार विद्यापीठ घराणेशाही रोखेल; सहकारमंत्री अमित शहा यांचे गुजरातमध्ये प्रतिपादन
Gujarat News: गुजरातमध्ये देशातील पहिले सहकार विद्यापीठ उभारले जाणार असून, घराणेशाहीला आळा बसणार आहे. सहकार क्षेत्रात आता केवळ प्रशिक्षित व पात्र उमेदवारांचीच निवड होईल, असे अमित शहा यांनी स्पष्ट केले.
आणंद : ‘‘गुजरातमध्ये स्थापन होत असलेल्या देशाच्या पहिल्या सहकार विद्यापीठाद्वारे घराणेशाहीला आळा बसेल. भविष्यात या क्षेत्रात फक्त पात्र आणि प्रशिक्षित व्यक्तींनाच नोकऱ्या मिळतील,’’ असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी शनिवारी केले.