Delhi Election : केजरीवाल अमित शहांना म्हणतात,' सर, मोफत चार्जिंगची सोयही केली आहे !

वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

  • केजरीवाल यांचे शहांना खोचक उत्तर

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 :
नवी दिल्ली : "सर, आमच्या सरकारने मोफत वाय-फाय सेवेबरोबरच मोफत बॅटरी चार्जिंगची सोयही केली आहे. कारण आमच्या सरकारने दिल्लीच्या नागरिकांसाठी 200 युनिटपर्यंत वीज मोफत दिली असल्याने गृहमंत्र्यांना विजेचे पैसे द्यावे लागणार नाहीत,'' अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना टोमणा मारला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत अमित शहा आणि केजरीवाल यांच्यामध्ये शुक्रवारी सोशल मीडियावरून शब्दिक चकमक झडल्याचे दिसले. दिल्ली भाजपने काल रात्री केलेल्या ट्‌विटमध्ये आम आदमी पक्षाच्या मोफत वाय-फाय सेवा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही उभारणीच्या निर्णयाची खिल्ली उडविली गेली. "अथकपणे प्रयत्न करूनही दिल्ली सरकारने देऊ केलेली मोफत वाय-फाय सेवा मिळू शकली नाही, उलट फोनची बॅटरी मात्र उतरली,' असे ट्विट केले होते. त्याला केजरीवाल यांनी त्याला अत्यंत नम्र व खोचक उत्तर गृहमंत्र्यांना दिले.

INDvsNZ:श्रेयस अय्यरनं विश्वास सार्थ ठरवला; टीम इंडियाचा दणदणीत विजय

दिल्लीतील एक हजार 41 सरकारी शाळांमध्ये 1.2 लाख सीसीटीव्ही उभारण्याच्या निर्णयावरही शहा यांनी केलेले वक्तव्याचे ट्विट दिल्ली भाजपने केले. नैऋत्य दिल्लीतील मतियाला भागात काल अमित शहा यांची प्रचारसभा झाली. त्यात त्यांनी "अगदी मोजके कॅमेरे उभारुन जनतेला मूर्ख बनविले आहे,' अशी टीका केली होती. त्यातील मोजके' या शब्दाचा संदर्भ घेत केजरीवाल यांनी आज ट्‌विट केले. "" तुम्हाला "मोजके' तरी सीसीटीव्ही दिसले, याचा मला आनंद होत आहे. कारण एकही कॅमेरा उभारला नसल्याचे विधान तुम्ही काही दिवसांपूर्वी केले होते. आता तुम्हाला शाळाही दाखवू का? मिळतील. दिल्लीतील जनतेने राजकारण बदलले आहे, याचा मला आनंद आहे. आता भाजपला सीसीटीव्ही आणि शाळांवर मते मागावी लागतील,'' असे प्रत्युत्तर त्यांनी शहा यांना दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah says phone died, but couldn't find WiFi Kejriwal says use our free charging points