अमित शाहांची सुरक्षा पुन्हा भेदली! TRS नेत्यानं ताफ्यापुढंच पार्क केली कार

तेलंगाणा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी शाहा तेलंगणाच्या दौऱ्यावर
Amit Shah Security
Amit Shah Security

हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षा व्यवस्थेत पुन्हा एकदा निष्काळजीपणा झाल्याचं समोर आलं आहे. तेलंगाणा मुक्ती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी ते हैद्राबादच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी शाह यांच्या ताफ्याच्या समोरच तेलंगाणा राष्ट्र समितीच्या (TRS) एका नेत्यानं आपली कार पार्क केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळं मोठी खळबळ माजली. (Amit Shah security breached TRS leader parked the car in front of the convoy in Hyderabad)

मुक्तीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी अमित शाह शुक्रवारी रात्री उशीरा हैद्राबादेत पोहोचले. याचवेळी शाह यांच्या ताफ्याच्या पुढे टीआरएस नेता गोसुला श्रीनिवास यांनी अचानक आपली कार उभी केली. या प्रकारामुळं सुरक्षा रक्षकांमध्ये खळबळ माजली. पण त्यांनी तात्काळ सतर्क होत त्यांची कार तिथून हटवली.

Amit Shah Security
Arvind Sawant: ईडीवाले सगळे आता तुमच्या पक्षात; अरविंद सावंत यांनी उपस्थित केला प्रश्न

दरम्यान, आपल्या कारची तोडफोड केल्याचा आरोप श्रीनिवास यांनी केला आहे. मी कार चालवताना तणावाच्या स्थितीत होतो त्यामुळं अचानक माझी कार त्या ठिकाणी थांबली. पण कार हटवण्यापूर्वीच सुरक्षा रक्षकांनी माझ्या कारची तोडफोड केली. याप्रकरणी मी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

मुंबईतही सुरक्षा भेदण्याचा झाला होता प्रयत्न

यापूर्वी गेल्या सोमवारी मुंबईमध्ये अमित शाह यांची सुरक्षा भेदून एक अनोळखी व्यक्ती सुमारे एक तास शाहांच्या आजूबाजुला घुटमळत होता. आपणं आंध्र प्रदेशातील एका खासदाराचा खासगी सचिव असल्याचं त्याचं म्हणणं होतं. यानंतर मुंबई पोलिसांनी धुळे जिल्ह्यातून हेमंत पवार नामक व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. त्याच्याजवळ गृहमंत्रालयाचं ओळखपत्र होतं. हा व्यक्ती राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या घराबाहेरची दिसून आला होता. या आरोपीला कोर्टानं सध्या पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com