ममतांना ‘जय श्रीराम’ची घृणा; बंगालमध्ये भाजपच सत्तेवर येणार

पीटीआय
Monday, 1 February 2021

केंद्रीय मंत्री अमित शहा हे  पश्‍चिम बंगालमध्ये येणार होते. पण नवी दिल्लीतील इस्राईलच्या दूतावासासमोर दोन दिवसांपूर्वी झालेल्या बाँबस्फोटाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांचा दौरा रद्द करण्यात आला. 

हावडा -  ‘‘ममता दीदींना ‘जय श्रीराम’ घोषणेबद्दल घृणा आहे. या घोषणेचा अपमान करणाऱ्या पक्षात कोणताही देशभक्त एक मिनिटही राहू शकत नाही. जो पक्ष आपसातच लढतो आणि स्वार्थासाठी केंद्र सरकारचा द्वेष करतो, अशा पक्षाचे समर्थन जनता कधीही करणार नाही. दीदींचा ‘टीएमसी’ पक्ष सत्तेवरून जाणार असून भाजप येणार आहे,’’ असा दावा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी रविवारी केला. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्मृती इराणी यांची प्रचारसभा डुमरजला स्टेडिअममध्ये झाली. निवडणुकीआधी त्या पहिल्यांदाच बंगालच्या दौऱ्यावर आल्या आहेत. केंद्रीय मंत्री अमित शहा हे आज पश्‍चिम बंगालमध्ये येणार होते. पण नवी दिल्लीतील इस्राईलच्या दूतावासासमोर दोन दिवसांपूर्वी झालेल्या बाँबस्फोटाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांचा दौरा रद्द करण्यात आला. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ममता सरकारने लॉकडाउनच्या काळातही भ्रष्टाचार केल्याचा आरोप करताना त्या म्हणाल्या की, कोरोनाच्या साथीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८० कोटी जनतेला आठ महिन्यांपर्यंत पाच किलो तांदूळ आणि एक किलो डाळ देण्याची व्यवस्था केली. पण तृणमूल काँग्रेस पक्षाने त्याची लूट केली. घरी आलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी गरीब रोजगार योजनेअंतर्गत देशभरात श्रम दिवसांचे आयोजन केले होते, पण बंगालमध्ये त्याची अंमलबजावणी झाली नाही. केंद्र सरकारने ज्या श्रमिक रेल्वे सोडल्या त्यांना ममता बॅनर्जी यांनी ‘कोरोना एक्स्प्रेस’ नाव दिले, असा दावा करीत देशातील विविध भागात काम करीत असलेल्या बंगालच्या मुला-मुलींना त्या व्हायरस मानतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amit shah smriti irani BJP will come to power in Bengal