
गृहमंत्री अमित शाह यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. शाह आपल्याच पक्षाच्या नेत्यावर प्रचंड संतापले असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायाल मिळत आहे. आता फार झालं. तुमचं भाषण थांबवा, अशा शब्दात त्यांनी आपल्याच नेत्याला खडसावलं. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. (Amit Shah Snubs Haryana Minister Anil Vij For His Lengthy Speech Saying You Were Given 5 Minutes )
एका कार्यक्रमात हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज भाषण करायला उभे होते. विज यांचं भाषण लांबल्याने अमित शाह अस्वस्थ झाले. विज यांच्या 8 मिनिटाच्या भाषणात शाह यांनी त्यांना चारवेळा टोकलं. तरीही विज यांनी भाषण सुरूच ठेवलं. त्यामुळे शाह संताप व्यक्त केला. तुम्हाला पाच मिनिटं दिली होती, आता फार झालं. तुमचं भाषण थांबवा, असं अमित शाह यांनी म्हटलं.
नेमकं काय घडलं?
अनिल वीज यांनी फक्त अमित शाह यांचं स्वागत करणं अपेक्षित होतं. पण त्यांनी अचानक हरियाणाचा इतिहास, हरित क्रांतीमधील राज्याचं योगदान, ऑलिम्पिकमधील कामगिरी, खेळासाठी उभारलेल्या पायाभूत सुविधा यांसंबंधी सांगण्यास सुरुवात केली.
वीज यांचं भाषण लांबत असल्याचं लक्षात येताच त्यांनी चिठ्ठी पाठवली आणि भाषण संपवा असं सांगितलं. पण त्याचा काहीही परिणाम होत नसल्याचं लक्षात येताच त्यांनी माईकवर हात मारत अप्रत्यक्षपणे सूचना केली. पण यानंतरही ते थांबले नाहीत.
यानंतर मात्र अमित शाह यांनी माईक हातात घेतला आणि अनिल वीज यांना भाषण थांबवा सांगितलं. “तुम्हाला पाच मिनिटं दिली होती. तुम्ही आधीच साडे आठ मिनिटं बोलला आहात. आता तुमचं भाषण थांबवा. मोठी भाषणं देण्याची ही जागा नाही. थोडक्यात आटोपा,” असें अमित शाह म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.