
आणंद : ‘‘सहकार क्षेत्रातील नेतृत्वाने यश मिळविण्यासाठी पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात यावा, त्याचप्रमाणे सहकार क्षेत्रातील सर्व घटकांच्या हिताला प्राधान्य द्यावे,’’ असे आवाहन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी रविवारी केले. सहकार मंत्रालयाच्या स्थपना दिनानिमित्त आणंद येथील अमूल डेअरीच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.