नितीश कुमार कधीही काँग्रेसच्या मांडीवर जावून बसतील; शहांचा लालूंना सूचक इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नितीश कुमार कधीही काँग्रेसच्या मांडीवर 
जावून बसतील; शहांचा लालूंना सूचक इशारा

नितीश कुमार कधीही काँग्रेसच्या मांडीवर जावून बसतील; शहांचा लालूंना सूचक इशारा

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारमधील पूर्णिया येथे जनभावना सभेत बोलताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यासोबतच त्यांनी लालू प्रसाद यादव यांना सूचक इशाराही दिला आहे. (Amit Shah news in Marathi)

हेही वाचा: Rajasthan : सचिन पायलटांना रोखण्यासाठी गेहलोतांचा मास्टर प्लान; CM पदाच्या शर्यतीत आता 'ही' 5 नावं

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले, 'नितीश बाबू, पंतप्रधान होण्यासाठी पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या मांडीवर जावून बसले आहेत. स्वार्थ आणि सत्तेच्या कुटील राजकारणामुळे ते पंतप्रधान होऊ शकणार नाही, हे देशातील जनतेला ठावूक आहे. विकासाच्या कामासाठी समर्पित आणि विचारधारा असलेल्यांनाच जनता पंतप्रधान बनवते, असंही शहा म्हणाले.

यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी लालू प्रसाद यादव यांचा खरपूस समाचार घेतला. मी येथे आल्यामुळे लालूजी आणि नितीशजींच्या पोटात दुखत आहे. 'लालूजी, मला तुमच्यात भांडण सुरू करण्याची गरज नाही, लढण्यासाठी तुम्ही पुरेसे आहात. तुम्ही आयुष्यभर तेच केले आहे. लालू यादव, लक्षात ठेवा, नितीश कुमार तुमची बाजू सोडून कधी काँग्रेसच्या मांडीवर जावून बसतील हे कळणारही नाही, असंही अमित शहा म्हणाले.

हेही वाचा: भारताला 2047 पर्यंत मुस्लीम राष्ट्र बनवण्याचं PFIचं उद्दिष्ट; आरोपीचा मोठा खुलासा

नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपची साथ सोडून बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलासोबत सत्तास्थापन केली. तसेच विरोधकांना एकत्र करण्याचं काम नितीश कुमार यांनी सुरू केलं आहे. नितीश कुमार आणि लालू यादव लवकरच दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिय गांधी यांनी भेट घेणार आहे.

Web Title: Amit Shah Told Lalu Prasad Yadav To Stay Away From Nitish Kumar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..