
Karnataka Election 2023: 'मिशन कर्नाटक' बंगळुरुतील 28 मतदारसंघावर भाजपचं लक्ष केंद्रीत
Karnataka Election 2023: कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील भाजपची सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बंगळुरुच्या दौऱ्यावर जाणार आहेत.(Amit Shah visit to Bengaluru karnataka bjp Vijay Sankalp Yatra )
कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये विधानसभेच्या 28 जागा असल्याने भाजपने या ठिकाणी लक्ष केंद्रीत केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज बंगळुरुच्या दौऱ्यावर आहेत.
कर्नाटक हे दक्षिणेतील एकमेव राज्य आहे ज्या ठिकाणी भाजपला आपले कमळ फुलवता आलं आहे. त्यामुळे दक्षिणेत पाय रोवायचे असतील तर कर्नाटकमध्ये सत्ता कायम ठेवण्याशिवाय भाजपला पर्याय नाही.
त्यामुळे भाजपने या ठिकाणी लक्ष केंद्रीत केलं असून केंद्रीय नेतृत्वाने स्वतः या ठिकाणी लक्ष घातल्याची माहिती आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे नेते बीएस येडियुराप्पा यांनी नुकतंच सक्रिय राजकारणातून निवृ्त्ती जाहीर केली आहे.
दुसरीकडे काँग्रेसनेही या ठिकाणी जोरदार तयारी सुरु केली असून स्थानिक नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या भागात दौरे सुरु केले आहेत. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकमध्ये काँग्रेसची स्थिती चांगली आहे.