गुन्हेगार ‘यूपी’तून करताहेत पलायन : अमित शहा | Amit Shaha | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमित शहा
गुन्हेगार ‘यूपी’तून करताहेत पलायन : अमित शहा

गुन्हेगार ‘यूपी’तून करताहेत पलायन : अमित शहा

कासगंज (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) पूर्वी सामान्य नागरिकांना पळून जावे लागत होते. मात्र परिस्थिती बदलली असून आता गुंड आणि गुन्हेगारांना (Criminals) पलायन करावे लागत आहे, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांनी आज केला. आज येथे झालेल्या सभेत अमित शहा यांनी समाजवादी पक्षावर टीकास्त्र सोडले.

अमित शहा म्हणाले,‘‘समाजवादी पक्षाच्या सत्तेच्या काळात ‘परिवारवाद’, ‘पक्षपात’ आणि ‘पलायन’ यांचा प्रभाव होता. आता भाजप सत्तेत आल्यापासून ‘विकासवाद’ सुरु झाला आहे. २०१४ पासून भाजपने येथे तीन निवडणुका जिंकून हॅट्‌ट्रिक साधली आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली २०२२ मधील निवडणूक जिंकून आम्ही चौकार मारू. आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपला तीनशेहून अधिक जागा मिळतील.’’ शहा यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचेही कौतुक केले.

हेही वाचा: मुलांच्या लसीकरणाचा मोदींचा निर्णय साफ चुकीचा; ‘एम्स’मधील वरीष्ठ शास्त्रज्ञाचा दावा

योगी हे ‘बुलडोझरनाथ’ : काँग्रेस

लखनौ : काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘महिला मॅरेथॉन’ला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यावर काँग्रेसने योगी आदित्यनाथ सरकारवर टीका केली आहे. हजारो मुलींच्या स्वप्नांचा चुराडा करणारे योगी हे ‘बुलडोझरनाथ’ आहेत, अशी टीका काँग्रेसने केली आहे. राज्यातील महिला हा अन्याय सहन करणार नाहीत, असा इशाराही काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी दिला आहे.

Web Title: Amit Shaha Speaks Criminals Uttarpradesh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Uttar PradeshAmit Shah