
पंजाबमधील 'वारीस पंजाब दे' संघटनेचे प्रमुख खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग यांच्या समर्थकांनी गुरुवारी गोंधळ घातला. अमृतपालचा सहकारी लवप्रीत तुफान याच्या अटकेच्या निषेधार्थ त्याच्या समर्थकांनी अजनाळा पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला. यानंतर अजनाळा कोर्टाने लवप्रीत तुफानला सोडण्याचे आदेश दिले आहेत.(Amritpal Singh aide Lovepreet Toofan to be released after Ajnala court order )
वारिस पंजाब दे संघटनेचे प्रमुख अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध चमकौर साहिब वरिंदर सिंग यांचे अपहरण करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला
याप्रकरणी अमृतपालचा जवळचा लवप्रीत तुफान याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर अमृतपाल सिंग यांच्या समर्थकांनी अजनाळा पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला.
इतकेच नव्हे तर पोलिसांवर हल्लादेखी केली. यामध्ये सहा पोलीस जखमी झाले असून, त्यांना अजनाळा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोण आहे 'लवप्रीत'? ज्याच्यासाठी अमृतपाल सिंगने अजनालामध्ये 'तुफान' निर्माण केलं
पंजाब दे संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांच्यासाठी लवप्रीत तुफान वारिस खूप खास आहे. तो गुरुदासपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. आणि वारिस हे पंजाब दे चे सक्रीय सदस्य आहेत. नुकतेच एका अपहरण प्रकरणात त्याचे नाव पुढे आले होते.
लवप्रीत तुफानने अमृतपाल सिंग यांच्याविरोधात टिप्पणी करणाऱ्या व्यक्तीचे अपहरण केल्याचा आरोप आहे. लवप्रीतवर त्या तरुणाला मारहाण केल्याचाही आरोप होता. मात्र, त्याला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले असून तो पूर्णपणे निर्दोष असल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमृतपाल सिंह यांच्या समर्थकांची अमृतसरमध्ये पोलिसांशी झटापट झाली. याप्रकरणी अमृतसरच्या एसएसपीने सांगितले की, अमृतपालने पुरावे दिले आहेत, तुफान सिंग दोषी नसल्याचे समोर आले आहे, त्यामुळे आज तुफान सिंगची सुटका होईल. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अमृतपाल सिंग कोण आहे?
अमृतपाल सिंग हा पंजाबमधील अमृतसरमधील जल्लूपूर खेडा गावचा रहिवासी आहे. त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले. त्याने खलिस्तान, भिंद्रनवाले आणि त्यासंबंधीचे सर्व ज्ञान इंटरनेटमुळे मिळवले. तो दुबईत राहून ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत होता. दुबईतील काम आटोपून गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तो पंजाबला परतला.
अमृतपाल हा जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा समर्थक आहे. तो खलिस्तानी समर्थक मानला जातो. अमृतपालला सप्टेंबरमध्ये संस्थेचा प्रमुख बनवण्यात आलं आहे. 'वारीस पंजाब दे' ही संघटना अभिनेता संदीप सिंग उर्फ दीप सिद्धूने स्थापन केली होती. २६ जानेवारी २०२१ रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या दंगलीत दीप सिद्धू हा मुख्य आरोपी होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.