Crime News: 11 वर्षाच्या मुलाकडून 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; घरी गेला, चॉकलेट दिलं अन्...

Boy allegedly assaulted 4 year old girl: पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले असून त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले. पीडित चिमुकलीची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
minor girl crime
minor girl crime
Updated on

मेरठ: उत्तर प्रदेशच्या सहारानपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका ११ वर्षीय मुलाने ४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले असून त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले. पीडित चिमुकलीची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भातील बातमी दिली आहे.

एसपी अभिमन्यू मांगलिक म्हणाले की, पीडितेच्या कुटुंबियांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मेडिकल रिपोर्टमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी बलात्काराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित चिमुकली ही आरोपीची शेजारी आहे. आरोपीला कोर्टासमोर हजर करण्यात आले होते, त्यानंतर त्याला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com