yogi adityanath letter
sakal
उत्तर प्रदेशातील वाढत्या रस्ते अपघातांमुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील जनतेला 'योगींची पाती' या नावाने एक कळकळीचे पत्र लिहिले आहे. सोमवारी प्रसिद्ध केलेल्या या पत्रात मुख्यमंत्र्यांनी रस्ते अपघातातील मृत्यूंबद्दल खोल दुःख व्यक्त केले असून, सुरक्षित प्रवासासाठी सरकारी यंत्रणेसोबतच नागरिकांचे सहकार्य आणि सजगता आवश्यक असल्याचे म्हटले आहे.